आज किंगफिशर हाऊस आणि किंगफिशर व्हिलाचा लिलाव

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई: बँकांच्या समुहाकडून आज(सोमवार) किंगफिशर हाऊस आणि किंगफिशर व्हिलाचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. उद्योगपती विजय मल्ल्यांकडून कर्ज वसुल करण्यासाठी बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सच्या दोन प्रमुख मालमत्तांचा लिलाव करण्याची योजना केली आहे.

हा किंगफिशर हाऊसच्या लिलावाचा चौथा प्रयत्न असून किंगफिशर व्हिलाच्या लिलावाचा तिसरा प्रयत्न आहे. या मालमत्तांच्या खरेदीसाठी आतापर्यंत एकही खरेदीदार पुढे आलेला नाही. बँकांनी यंदा खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मालमत्तांची राखीव किंमत कमी केली आहे. किंगफिशर हाऊसची राखीव किंमत 10 टक्क्यांनी कमी करुन 103.50 कोटी रुपये केली आहे. त्याचप्रमाणे, किंगफिशर व्हिलाची किंमत 73 कोटी रुपयेएवढी निश्चित करण्यात आली आहे.

बँकांच्या वतीने एसबीआयकॅप्स ट्रस्टी या लिलावाचे आयोजन करणार आहे. विजय मल्ल्यांच्या किंगफिशरला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह 17 बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज यामुळे कर्जाची थकबाकी नऊ हजार कोटींपर्यंत वाढली आहे.