शेअर बाजाराची घसरणीने सुरूवात

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरणीने सुरूवात झाली आहे. सध्या (10 वाजून 45 मिनिटे) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 96 अंशांच्या घसरणीसह 31,041.86 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 46 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या 9,529.20 अंशावर आहे.

क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी, फार्मा, मेटल आणि रिअल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह आहे. एफएमसीजी निर्देशांकात 1.15 टक्के, फार्मा निर्देशांकात 0.60 टक्के आणि मेटल निर्देशांकात 0.42 टक्के आणि रिअल्टी कंपन्यांच्या निर्देशांकात 0.32 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. याउलट पीएसयू बॅंक आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा मारा सुरू आहे. परिणामी निर्देशांकात घसरण झाली आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात आयटीसी, ऑरो फार्मा, भारती, टेक महिंद्रा आणि अदानी पोर्टचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर बीपीसीएल, बँक ऑफ बडोदा, झी आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.