भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या हिस्साविक्रीला आजपासून सुरुवात

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या(बीईएल) दोन दिवसीय हिस्साविक्रीला आज(बुधवार) सुरुवात होत आहे. याअंतर्गत 'ऑफर फॉर सेलद्वारे' कंपनीच्या एक कोटी अकरा लाख शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिशेअर 1498 रुपयांची रक्कम निश्चित झाली आहे.

या हिस्साविक्रीतून सरकारी तिजोरीत 1,600 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. आज संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर विक्री केली जाणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना उद्या(गुरुवार) शेअर खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे. सुमारे 34,843.5 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्सची कंपनीत 74.41 टक्के हिस्सेदारी आहे.

मुंबई शेअर बाजारात बीईएलचा शेअर सध्या(10 वाजून 30 मिनिटे) 1520.95 रुपयांवर व्यवहार करत असून 2.50 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: Bharat Electronics falls 3% as its 5% stake sale begins today