बिग बझार'मध्येही मिळणार दोन हजारापर्यंत रोख रक्कम

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: रोख तुटवड्याचा सामना करणाऱ्या ग्राहकांसाठी 'बिग बझार'ने उद्यापासून

(ता. 24) दोन हजार रुपयांपर्यंत रोख उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. देशातील 115 शहरांमधील 258 बिग बझार आणि एफबीबी स्टोअर्समध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ग्राहकांना आपले डेबिट/एटीएम कार्ड्स वापरुन स्वतःच्या बँक खात्यातून रु.2,000 पर्यंत रोख रक्कम उपलब्ध करुन दिली जाईल, असे बिग बझारने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

"काही चलनी नोटांवर बंदी आल्याने ग्राहकांसमोर निर्माण झालेल्या समस्या दूर करण्याचा व केंद्र सरकारचे यामागील उद्दिष्ट साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. बँकांमध्ये रांगेत थांबण्यापेक्षा आमच्या स्टोअर्समध्ये ग्राहकांचे स्वागत आहे.", असे फ्युचर रिटेलचे अध्यक्ष किशोर बियाणी म्हणाले. बिग बझार स्टोअर्स फ्युचर रिटेल समुहाचा भाग आहे.  

भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) आपल्या पीओएस मशीन्सद्वारे बँकेची रोख उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहकांना इतर बँकांच्या खात्यांमधूनदेखील रक्कम मिळणार असल्याचे बिग बझारने सांगितले आहे. काही दिवसांपुर्वी पेट्रोल पंपावर कार्ड स्वाइप करुन रोख रक्कम मिळण्याची सोय करण्यात आली होती.  

अर्थविश्व

नवी दिल्ली - देशाच्या एकूण देशाअंतर्गत उत्पादनात (जीडीपी) २७ टक्के हिसा उचलणारी राज्ये सध्या पूरग्रस्त असल्याची बाब मुख्य...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई - शेअर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी ‘आधार’ क्रमांक बंधनकारक करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक सेबीने घेतला...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मागील पंधरा दिवसांत शेअर बाजारात झालेली उलथापालथ पाहून गुंतवणूकदारांना काही प्रश्न नक्की पडले असतील. बाजार अजून खाली जाईल का?,...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017