65,250 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड: जेटली

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

या योजनेमुळे काळा पैसा जाहीर करून कायदेशीर कारवाई टाळता येईल. यातून मिळणाऱ्या कर उत्पन्नामुळे केंद्राला अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यास मदत होणार आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत तब्बल 65,250 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. याअंतर्गत एकुण 64,275 व्यक्तींनी आपले उत्पन्न उघड केले आहे, परंतु या व्यक्तींची ओळख गुप्त राखली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एचएसबीसीच्या यादीतून रु.8,000 कोटींच्या रकमेचे मूल्यमापन झाले आहे. याशिवाय, छापेमारीतून 56,378 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. प्रत्येक करदात्याने सरासरी एक कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न जाहीर केले आहे. मूल्यमापनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर या आकडेवारीत आणखी बदल होऊ शकतो, असेही जेटली यांनी नमूद केले.

आर्थिक वर्ष 2015-16 किंवा त्यापुर्वीची बेहिशेबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत चार महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर केल्यास 45 टक्के अधिभार आणि दंड भरावा लागत आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये सप्टेंबर 2017 पर्यंत भरण्याची मुभाही देण्यात आलेली आहे.

या योजनेमुळे काळा पैसा जाहीर करून कायदेशीर कारवाई टाळता येईल. यातून मिळणाऱ्या कर उत्पन्नामुळे केंद्राला अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यास मदत होणार आहे.

अर्थविश्व

शेअर बाजारात या आठवड्यात थोडेफार चढ-उतार झाले असले तरी हा बाजार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. अशी उच्चांकी पातळी गाठली गेली की...

शनिवार, 24 जून 2017

गृह मंत्रालयाची सूचना; कारवाईचा इशारा नवी दिल्ली: परकी निधी स्वीकारत असलेल्या 1 हजार 927 स्वयंसेवी संस्थांनी बॅंक खात्याचे...

शनिवार, 24 जून 2017

नवी दिल्ली: राष्ट्रीय शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स(एफअँडओ) विभागात पाच नव्या कंपन्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे....

शनिवार, 24 जून 2017