‘बँक ऑफ इंडिया’कडून ट्रान्सयूनियन सिबीलच्या हिस्सेदारीची विक्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या बँक ऑफ इंडियाने (बीओआय) ट्रान्सयूनियन सिबील लिमिटेडमधील संपूर्ण हिस्सेदारीची विक्री केली आहे. बीओआयचा ट्रान्सयूनियन सिबील लिमिटेडमध्ये पाच टक्के हिस्सेदारी होती. ट्रान्सयूनियन इंटरनॅशनल इंकला ही विक्री करण्यात आली आहे.

बॅंकेने पाच टक्के म्हणजे 12,50,000 शेअर्सची विक्री केली आहे. 22 मार्चरोजी प्रतिशेअर 1,525 रुपयांप्रमाणे शेअर्सची विक्री करण्यात आली असून यातून बॅंकेला रु.190.62 कोटींचा निधी मिळाला आहे, अशी माहिती बॅंकेने शेअर बाजाराला सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

सिबीलने ऑगस्ट 2000 मध्ये कार्याला सुरूवात केली होती. सध्या मुंबई शेअर बाजारात बीओआयचा शेअर 126.30 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 0.50 पैशांची वाढ झाली आहे.

Web Title: BoI sells entire 5% stake in TransUnion CIBIL for Rs 190.62 crore