बीएसएनएलची नवी ऑफर दररोज देणार तब्बल 4 जीबी डेटा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या आगमनानंतर तीव्र झालेली दूरसंचार क्षेत्रातील चढाओढ अद्याप कायम असून आता भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) ग्राहकांसाठी नवी 'चौका-444' ऑफर सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत 3जी नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज तब्बल 4 जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना एकुण 444 रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी या प्रीपेड मोबाईल योजनेचा लाभ घेता येईल.

हा आतापर्यंत एखाद्या कंपनीने दिलेला सर्वाधिक डेटा असेल. बीएसएनएलच्या प्रतिस्पर्ध्यांकडून सध्या दिवसाला 2 जीबी डेटा दिला जातो. याआधीदेखील बीएसएनएलने 333 रुपयांमध्ये दिवसाला 3 जीबी डेटा देण्याची घोषणा केली होती.

( आणखी वाचा : 'जिओ'ला टक्कर देण्यासाठी 'बीएसएनएल'चा नवा प्लॅन)

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने ग्राहकांना सुरुवातीचे काही महिने डेटा मोफत देण्याची घोषणा करीत दूरसंचार क्षेत्रात धूमाकूळ घातला. लाखो ग्राहकांनी आपला मोर्चा जिओकडे वळविला. तेव्हापासून दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यादेखील विविध योजना आणत आपला ग्राहकवर्ग टिकवू पाहत आहेत. (आणखी वाचा : 'रिलायन्स जिओ'चा सर्वात स्वस्त 'प्लॅन'! )