सेन्सेक्‍स चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर 

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात आलेली तेजीची लाट गुरुवारी काही प्रमाणात ओसरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज 84 अंशांनी वाढून 28 हजार 227 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टीत 17 अंशांनी वधारुन 8 हजार 734 अंशांवर बंद झाला. 

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे आशादायी वातावरण निर्माण झाल्याने काल (बुधवारी) सेन्सेक्‍सने 486 अंशांची झेप घेतली होती. जागतिक पातळीवर चिंताजनक स्थिती असूनही आरोग्यसुविधा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज खरेदीचा जोर दिसून आला. अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेकडून व्याजदर 'जैसे थे' ठेवल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण पुढील आठवड्यात असल्याने गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. 

सेन्सेक्‍स आज 28 हजार 226 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची 4 ऑक्‍टोबरनंतरची उच्चांकी पातळी आहे. इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रा यांच्या समभागात आज 2.85 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. डॉ. रेड्डीज लॅबच्या समभागात आज सर्वाधिक 3.31 टक्के वाढ झाली. त्याखालोखाल सन फार्मा 2.64 टक्के वाढ झाली. हिरो मोटोकॉर्प, एम ऍण्ड एम आणि टाटा मोटर्स यांच्या समभागांवर आज विक्रीचा जोर दिसून आला.

अर्थविश्व

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017