डी-मार्टच्या शेअरची 604 रुपयांवर दणदणीत नोंदणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई:अॅव्हेन्यू सुपरमार्टस्‌ लि. अर्थात "डीमार्ट'च्या शेअरची आज(मंगळवार) 604.4 रुपयांवर नोंदणी झाली आहे. गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या दणदणीत प्रतिसादानंतर इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट वाढीसह कंपनीच्या शेअरची नोंदणी झाली आहे. कंपनीने नोंदणीसाठी प्रतिशेअर 299 रुपयेएवढी इश्यू प्राइस निश्चित केली होती.

मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 604.40 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने दिवसभरात 558.75 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 615 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या(10 वाजून 48 मिनिटे) कंपनीचा शेअर 592.00 रुपयांवर व्यवहार करत असून 293.00 रुपयांनी म्हणजेच तब्बल 97.99 टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. कंपनीचा आयपीओ अखेरच्या दिवशी 103 पट अधिक सबस्क्राइब्ड झाला होता. हा पब्लिक इश्‍यू 1865.57 कोटी रुपयांचा असून, यासाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. 295-299 असा ठेवण्यात आला होता. गुंतवणूकदारांना कमीत कमी 50 (रु.14,950) व जास्तीत जास्त 650 (रु. 1,94,350) शेअरसाठी किरकोळ गुंतवणूकदार अर्ज करता येणार होता.