कॉसमॉस बॅंकेला ७१.७३ कोटींचा नफा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - कॉसमॉस को-ऑप. बॅंकेला ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ७१.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी जाहीर केले आहे.

बॅंकेची १११वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर सभागृह येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी अध्यक्ष काळे यांच्यासह उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर, डॉ. मुकुंद अभ्यंकर, कृष्णकुमार गोयल आदी सर्व संचालक उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांनी बॅंकेची भूमिका विशद केली. संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने १० टक्के लाभांशासाठी रिझर्व्ह बॅंकेला विनंती अर्ज करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

मार्च २०१७ अखेर बॅंकेच्या ट्रेझरी विभागास रु. २२९ कोटींचा विक्रमी नफा झाला. सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च नफा आहे. ट्रेझरीचा एकूण व्यवसाय रु. ५०५७ कोटींचा असून, त्याअनुषंगाने हा नफा विशेष उल्लेखनीय आहे. 

२०१५-१६ मध्ये बॅंकेचा करपूर्व नफा हा रु. ३३.६२ कोटी होता; तर मार्च २०१७ अखेरीस रु. ११५.८४ कोटींचा करपूर्व नफा  झाला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बॅंकेची सांपत्तिक स्थिती भक्कम झाली असून, एकूण निधी रु. १४५०.४१ कोटी झाला आहे; तर बॅंकेच्या भांडवल पर्याप्तचे प्रमाण (सीएआर) १५.३८ टक्के इतके आहे. बॅंकेच्या ठेवी १५,६४९ कोटी रुपयांवर पोचल्या असून, बॅंकेने ११,४६१ कोटी रुपयांचे कर्जवितरण केल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: business news cosmos bank 71.73 crores profit

टॅग्स