परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी साडेपाच हजार कोटी काढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरियात संघर्ष चिघळल्यानंतर जागतिक बाजारातील तणाव निर्माण झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख बाजारांतून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. याचा फटका भारतीय बाजारांना बसला आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदरांनी (एफपीआय) चालू महिन्यात बाजारातून तब्बल साडे पाच हजार कोटी काढून घेतले आहेत.

गेल्या महिनाभरापासून परकीय गुंतवणूकदार इक्विटीमधून पैसे काढत असून कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी 12 हजार 770 कोटी काढून घेतले होते. त्याआधीच्या सहा महिन्यांमध्ये "एफपीआय"ने 62 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. शेअर बाजाराच्या माहितीनुसार एफपीआयने 1 ते 22 सप्टेंबर दरम्यान शेअर बाजारातून 5 हजार 492 कोटी काढून घेतले आहेत. याच कालावधीत त्यांनी रोख्यांमध्ये 4 हजार 430 कोटींची गुंतवणूक केली आहे. जागतिक पातळीवरील अनिश्‍चितता हे प्राथमिक कारण असले तरी "एफपीआय"च्या विक्रीमागे नफेखोरी असल्याचा अंदाज शेअर दलालांचा अंदाज आहे.

Web Title: business news investment