‘कॅपेसाइट इन्फ्राप्रोजेक्ट’चा आयपीओ 13 सप्टेंबर रोजी खुला होणार

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मुंबई: मुंबईतील कॅपेसाइट इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड ही निवासी, व्यावसायिक आणि संस्थांचे बांधकाम करणारी वेगाने वाढणारी कंपनी असून या कंपनीचे इनिशियल पब्लिक ऑफर (“आयपीओ”) 13 सप्टेंबर 2017 पासून खुला होणार असून 15 सप्टेंबर 2017 रोजी बंद होईल. या इश्यूची किंमत दर्शनी मूल्य रु. 10 प्रती शेअर किंमत पट्टा रु. 245 – रु. 250 (“इक्विटी शेअर”) असे असणार आहेत.  या आयपीओमध्ये इक्विटी शेअरचा ताजा इश्यू सरासरी रु.400 कोटींचा आहे.

मुंबई: मुंबईतील कॅपेसाइट इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड ही निवासी, व्यावसायिक आणि संस्थांचे बांधकाम करणारी वेगाने वाढणारी कंपनी असून या कंपनीचे इनिशियल पब्लिक ऑफर (“आयपीओ”) 13 सप्टेंबर 2017 पासून खुला होणार असून 15 सप्टेंबर 2017 रोजी बंद होईल. या इश्यूची किंमत दर्शनी मूल्य रु. 10 प्रती शेअर किंमत पट्टा रु. 245 – रु. 250 (“इक्विटी शेअर”) असे असणार आहेत.  या आयपीओमध्ये इक्विटी शेअरचा ताजा इश्यू सरासरी रु.400 कोटींचा आहे.

कंपनी या इश्यूमधून मिळालेली रक्कम खेळते भांडवल गरजांसाठी; भांडवली मालमत्ता खरेदीकरिता भांडवल (सिस्टीम फॉर्मवर्क); आणि (ईयी) सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाणार आहे

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस रेग्युलेशन रुल्स, 1957च्या 19(2)(बी)मध्ये केलेल्या सुधारणेनुसार आयसीडीआर नियमाच्या 41 नियमान्वये हा इश्यू सेबी आयसीडीआर नियमावलीच्या कलम 26(1) अन्वये बुक बिल्डिंग प्रक्रियेने होणार असून ज्यामध्ये किमान 50% इश्यू पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्वालिफाइड इनस्टिट्यूशनल बायर्स –क्यूआयबी वर्ग) साठी राखून ठेवण्यात आला आहे, पण या विषयावर, बीएलआरएमशी सल्लामसलत करून, सेबी नियमांच्या (पायाभूत गुंतवणूकदार भाग) अन्वये स्वैच्छिक तत्वावर क्यूआयबी वर्गातील 60% भाग पायाभूत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवणार आहे, ज्यापैकी एक तृतियांश भाग स्वदेशी म्युच्यूअल फंडांसाठी राखीव असून तो स्वदेशी म्युच्यूअल फंडांकडून येणा-या वैध बोलीच्या किंवा पायाभूत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या किमतीपेक्षा जास्त असलेल्या बोलीच्या अधीन आहे. क्यूआयबी वर्गाच्या 5%(पायाभूत गुंतवणूकदार भाग वगळून) भाग केवळ म्युच्यूअल फंडांसाठी गुणोत्तर तत्वावर उपलब्ध करुन दिला जाईल आणि क्यूआयबी वर्गाचा उरलेला भाग गुणोत्तर तत्वावर सर्व क्यूआयबींना (पायाभूत गुंतवणूकदार वगळता) उपलब्ध करुन दिला जाईल, ज्यामध्ये म्युच्यूअल फंडांचा समावेश असेल, जे इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर मिळवल्या जाणा-या बोलींच्या अधीन असतील.

शिवाय, या इश्यूचा 15% भाग संस्थात्मक नसलेल्या बोलीकर्त्यांसाठी गुणोत्तर तत्वावर उपलब्ध असेल आणि इश्यूच्या35% भाग व्यक्तीगत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असून, आयसीडीआर नियमान्वये इश्यू प्राइसवर किंवा त्याहून जास्त किमतीवर त्यांच्याकडून लावल्या गेलेल्या वैध बोलींच्या अधीन असेल. पायाभूत गुंतवणूकदार वगळता, इतर सर्व गुंतवणूकदार ब्लॉक रकमेचे समर्थन लाभलेल्या निवेदनाद्वारे (“एएसबीए”) सक्तीने ऑफरमध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या संबंधित एएसबीए खात्याची माहिती उपलब्ध करुन देतील. ही खाती इश्यूमध्ये सहभागी झाल्याने सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बॅंक (“एससीएसबी”)द्वारे ब्लॉक करण्यात येतील.

एक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्ज लिमिटेड आणि विवरो फायनाशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम’ज”) आहेत. कॅपेसाइट इन्फ्राप्रोजेक्टच्या शेअरची एनएसई आणि बीएसईमध्ये नोंदणी केली जाईल.

Web Title: business news ipo