संपूर्ण व्यवसाय नियंत्रणासाठी मायक्रोसॉफ्टची 'कैझाला प्रो' आवृत्ती

संपूर्ण व्यवसाय नियंत्रणासाठी मायक्रोसॉफ्टची 'कैझाला प्रो' आवृत्ती

पुणे : मोठ्या गटांतील संपर्क आणि कामाच्या व्यवस्थापनासाठी खास तयार करण्यात आलेल्या मायक्रोसॉफ्ट कैझालामुळे संस्थांना अखंडपणे समन्वय, संपर्क साधण्यात, व काम पूर्ण करणे सोपे झाले आहे. यामध्ये संस्थेत किंवा संस्थेच्या बाहेर असतील अशा डेस्कटॉप वापरणारे व फक्त मोबाइल वापरणारे यांना एकत्र आणले जाते. मायक्रोसॉफ्ट इंडियातर्फे त्यांची व्यावसायिक आवृत्ती म्हणजेच कैझाला प्रोच्या उद्घाटनाचीही घोषणा करण्यात आली आहे. जे संस्थांना त्यांच्या ग्रुप्सवर संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण मिळवून देते.

भारतातील उद्योगसंस्था या अधिक विस्तारित होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विस्तारलेल्या टीम्स व भागीदारां बरोबर संपर्कात रहाणे महत्वाचे असते. हे जवळपास सर्व उद्योगांत दिसून येते, ज्यात बांधकाम, उत्पादन निर्मिती, विमा आणि आरोग्यसेवा ते रिटेल अशा उद्योगांचा समावेश होतो. मायक्रोसॉफ्ट कैझाला संस्थेतील आणि संस्थेबाहेरील लोकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क साधण्यात, वैल्यू चेनमधील कार्यासाठी सहजपणे सहयोग देण्यात आणि अंमलात आणता येणारे विचार प्राप्त करण्यात संस्थांना मदत करते. मायक्रोसॉफ्ट कैझाला चे वापरकर्ते त्यांचा मोबाईल फोन नंबर मुख्य युनिक आयडी म्हणून वापरून सहजपणे संपर्क साधू शकतात. मायक्रोसॉफ्ट कैझाला हे मायक्रोसॉफ्ट अझुरे या मायक्रोसॉफ्ट च्या विश्वसनीय क्लाउड प्लॅटफॉर्म वर आधारित आहे. हे उत्पादन व्यावसायिक वापरासाठी तयार आहे.

मायक्रोसॉफ्ट हे डिजिटल इंडियाच्या ध्येयाशी खोलवर जोडलेले आहे आणि भारताच्या वेगवान प्रगतीत तंत्रज्ञान अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे याची त्यांना जाणीव आहे. मोबाइलचा प्रामुख्याने वापर करणारी व फक्त मोबाइल वापरणारी कार्यशक्ती एकमेकांना जोडणे आणि सहयोग व कामाचे नियोजन करण्यासाठी सक्षम करणे हे मायक्रोसॉफ्ट कैझालाचे ध्येय आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष, अनंत महेश्वरी म्हणाले, "डिजिटल इंडियाच्या योजनेचा भर हा तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला बदल घडविण्यासाठी मदत करण्यावर आहे. मायक्रोसॉफ्ट कैझाला, जे भारतासाठी तयार करण्यात आलेले उत्पादन आहे, यात फक्त मोबाइलवर वापरण्यात येणारी मेसेजिंग ऍप्स व डिजिटल माध्यमांचा वापर करणारी आधुनिक कार्यस्थळे या दोन भिन्न जगांना एकत्र आणले जाते. या उत्पादनामुळे संस्थांना संस्थेतील तसेच संस्थेबाहेरील सर्वांशी सहजपणे व समृद्ध विषयांनिशी संवाद साधणे शक्य होईल. मायक्रोसॉफ्ट कैझाला हे २जी नेटवर्क साठी अनुकूल बनविण्यात आले आहे ज्यामुळे दूरच्या प्रदेशांतही संपर्क साधता येईल आणि यात ऑफलाईन सपोर्ट साठी विशिष्ट तरतूद आहे."

मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रॉडक्ट ग्रुप विभागाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, "मायक्रोसॉफ्ट कैझालाचा वापर करून संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांशी व विस्तारित मूल्य साखळीशी संपर्क साधू शकतात. या उत्पादनात सोपे आणि ओळखीचे चॅट इंटरफेस आहे आणि चॅटमध्येच सर्वेक्षण, पोल, मिटींग्स आणि इतर गोष्टींचा वापर करून सर्वांना अधिक कार्यक्षम बनवते. 

मायक्रोसॉफ्ट कैझाला आणि मायक्रोसॉफ्ट कैझाला प्रो हे दोन्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिसला अनुकूल आहेत. आजपासून मायक्रोसॉफ्ट कैझाला हे भारतात आयओएस आणि अँड्रॉइड फोन वर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्ट कैझाला प्रो हे 130 रुपये प्रति युजर दर महिना या दराने विकत घेता येऊ शकते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com