'PNB'ने सुरक्षेसाठी 1 लाख मेस्ट्रो डेबिट कार्डं मागवली परत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

'पीएनबी'चे देशभरात 5 कोटी 65 लाख कार्डधारक आहेत. यातील जवळपास एक लाख ग्राहकांकडे मायस्ट्रो डेबिट कार्ड असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेने मायस्ट्रो डेबिट कार्ड माघारी मागवली आहेत. सुरक्षेविषयीची ईएमव्ही चीप असलेली नवी डेबिट कार्ड ग्राहकांना निशुल्क बदलून देणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

31 जुलैपर्यंत ग्राहकांनी 'पीएनबी'च्या कोणत्याही शाखेत जाऊन कार्ड बदलून घ्यावीत अन्यथा ती ब्लॉक होतील, असे बॅंकेने म्हटले आहे. ईएमव्ही चीप बेस्ड कार्डचे वितरण करण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे 'पीएनबी'तील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

'पीएनबी'चे देशभरात 5 कोटी 65 लाख कार्डधारक आहेत. यातील जवळपास एक लाख ग्राहकांकडे मायस्ट्रो डेबिट कार्ड असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

■ ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट