आता सिंडिकेट बॅंकेकडून बचत खात्यावरील व्याजाला कात्री

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात जाहीर केली आहे. बचत खात्यावरील व्याज आता 0.5 टक्क्याने कमी करून 3.50 टक्के केले आहे. 25. लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर यापुढे साडेतीन टक्के व्याज मिळेल, असे बॅंकेने म्हटले आहे.

नवे व्याजदर 10 ऑक्टोबर लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती बॅंकेने शेअर बाजाराला दिली आहे. सिंडिकेट बॅंकेसह बर्‍याच बँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे.

आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात सिंडिकेट शेअर 63.40 रुपयांवर व्यवहार करत असून तो अर्ध्या टक्क्याने वधारला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बॅंकेचे रु.5,734.78 कोटींचे बाजारभांडवल आहे.