नॅनोचे इलेक्‍ट्रिक व्हर्जन येणार? 

नॅनोचे इलेक्‍ट्रिक व्हर्जन येणार? 

नवी दिल्ली -  टाटा मोटर्स येत्या २८ नोव्हेंबरला टाटा नॅनोचे इलेक्‍ट्रिक व्हर्जन सादर करण्याची शक्‍यता आहे. ऑटोकार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,  हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नॅनोच्या नव्या इलेक्‍ट्रिक व्हर्जनची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. 

टाटा नॅनोचे इलेक्‍ट्रिक व्हर्जन ’जयॅम नियो’ नावाने सादर केले जाण्याची शक्‍यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ’ओला’ कंपनीला ४०० ’जयॅम नियो’ पुरवल्या जाणार आहेत. ऑटोकार इंडियाच्या अहवालानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यास टाटा नॅनोचे इलेक्‍ट्रिक व्हर्जन १५० किमी चालणार आहे. 

कोइमतूरमधील जयॅम ऑटोमेटिव्हज आणि टाटा मोटर्समध्ये करार झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही कंपन्या ’जेटी स्पेशल व्हेईकल’ या संयुक्त उपक्रमाअंतर्गत टाटा नॅनोचे इलेक्‍ट्रिक व्हर्जन तयार करणार आहेत. जयॅम ब्रॅडच्या नावाने  इलेक्‍ट्रिक व्हर्जन विकले जाणार असल्याने ’जयॅम नियो’ या नावाने नॅनो विकल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com