गोपनीयतेचा भंग केल्यास काळापैसाधारकांची माहिती नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

स्वित्झर्लंड सरकारचा इशारा

बर्न: स्विस बॅंकेमधील काळापैसा धारकांची माहितीचे स्वयंविनियम करण्यासंदर्भात भारतासह जगभरातील देश आग्रही असून, पुढील वर्षांपासून हे स्वयंविनियम स्वित्झर्लंड सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मात्र गोपनीयतेचा भंग केल्यास काळापैसाधारकांसंबंधी कोणतीही माहिती दिली जाणार नाही, अर्थात स्वयंविनियम रद्द करण्यात येईल, असा इशारा स्वित्झर्लंड सरकारने दिला आहे.

काळ्या पैशांविरोधात आंतरराष्ट्रीय बांधिलकी म्हणून 1 जानेवारी 2017 पासून स्वित्झर्लंड सरकारने काळापैसाधारकांच्या माहितीचे स्वयंविनियम करण्यासंबंधी पुढाकार घेतला होता. तसेच काळापैसाधारकांची सविस्तर माहिती देण्याची प्रक्रिया पुढील वर्षापासून पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील स्वयंविनिमय होणाऱ्या देशामध्ये भारताचाही समावेश आहे.

"काळापैसाधारकांसंबंधीची माहिती संकलित करण्याचे काम स्थानिक वित्त पुरवठादार संस्थांकडून सुरू आहे. या वर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारे माहितीचे संकलन करण्यात येत आहे. स्विस बॅंक 2018 मध्ये संकलित माहिती संबंधित देशांच्या स्वाधीन करणार आहे, असे आंतरराष्ट्रीय वित्त व्यवहार (एसआयएफ) विभागाच्या सचिवांनी सांगितले.
वित्त व करप्रकरणांच्या आंतरराष्ट्रीय विवादामध्ये स्वित्झर्लंड सरकारचे हित प्राधान्यक्रमावर असणार आहे. तसेच स्विस बॅंक खातेधारकांची माहिती चुकीच्या व्यक्तींकडे जाऊ नये किंवा या माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून आवश्‍यक ती पावले उचलली जाणार असल्याचेही या वेळी "एसआयफ'च्या सूत्रांनी सांगितले.