'सीसीडी'च्या मालकाच्या घरात सापडले 650 कोटी 

ccd
ccd

बंगळूर: माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व 'कॅफे कॉफी डे'चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या देशभरातील 20 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. त्यातून सुमारे 650 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या घरी आणि देशातील त्यांच्या 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. 

प्राप्तिकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यांच्या घरातून 650 कोटींची अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली असून आणखी काही कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहे. सिद्धार्थ यांच्याकडे आणखी काळा पैसा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सीसीडी हे भारतातील आघाडीचे कॉफी विक्रीची केंद्र आहे. सिद्धार्थ हा एस. एम. कृष्णा यांचा जावई असून, कृष्ण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबई, चेन्नई आणि चिकमंगळूर येथील सीसीडी केंद्रांसह अन्य 20 केंद्रांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. 

आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात कॉफी डे एंटरप्राइझेसचा शेअर 208.45 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 23.45 रुपयांनी म्हणजे 10.11 टक्क्यांनी घसरला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.4,305.44 कोटींचे बाजारभांडवल आहे.
शेअरने इंट्राडे व्यवहारात 204.65 रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com