गुंतवणुकीची संधी: ‘सीडीएसएल’चा आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

मुंबई: देशात रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा देणाऱ्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसचा (सीडीएसएल) आयपीओ आजपासून (ता. 19) खुला झाला आहे. इच्छुक गुंतवणूकदारांना पुढील दोन दिवस म्हणजे 21 जूनपर्यंत सीडीएसएलच्या आयपीओसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी रु.145-149 किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे. किंमान 100 शेअर्ससाठी अर्ज करणे बंधनकारक असून त्यापटीत अधिक शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे.

कंपनीने आयपीओपुर्वी काल(शुक्रवार) 15 प्रमुख(अँकर) गुंतवणूकदारांकडून 154.07 कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे. अबु धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी-बिहेव, एफआयएल इन्व्हेस्टमेंट्स(मॉरिशस), गोल्डमन सॅक्स इंडिया, एसबीआय मॅग्नम टॅक्स गेन स्कीम, डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी सेव्हिंग्स फंड आणि अन्य काही गुंतवणूकदारांना सुमारे 1.03 कोटी शेअर्सचे वाटप केले आहे. प्रतिशेअर 149 रुपयांप्रमाणे हे शेअरवाटप करण्यात आले आहे.

प्राथमिक समभाग विक्री योजनेअंतर्गत कंपनी एकुण 3.52 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. यापैकी 7 लाख शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मुंबई शेअर बाजार (बीएसई), स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय), बँक ऑफ बडोदा आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आपल्या मालकीच्या 3.45 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. ऊर्वरित सात लाख शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे, अशी माहिती कंपनीने सादर केलेल्या डीआरएचपीमध्ये देण्यात आली होती. सीडीएसएलच्या शेअर्सची राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे.

सीडीएसल आणि एनएसडीएल या सध्या देशातील दोन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रोख्यांच्या भांडार असलेल्या संस्था आहेत. सीडीएसएलच्या डिमॅट खातेधारकांची संख्येने 2016 अखेर एक कोटी 60 लाखांचा टप्पा ओलांडला होता.