तुमच्या मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये जीएसटीनंतर होणार हे बदल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे: देशभरात आज, शुक्रवारी मध्यरात्रीपासून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात काही वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. तर काही महागणार आहेत. त्यापैकी सध्या सर्वात वापरली जाणारी दूरसंचार सेवा महागणार आहे.

दूरसंचार क्षेत्र जीएसटीमुळे महागणार आहे. कारण केंद्र सरकारने आता दूरसंचार क्षेत्रासाठी 18 टक्के कराचा स्लॅब निश्चित केला आहे. तो सध्या 15 टक्के आकारला जातो. जिओमुळे दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आता या दरवाढीनंतर सर्व बोझा पुन्हा ग्राहकांवर पडणार आहे. प्रिपेडपेक्षा पोस्टपेड ग्राहकांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रिपेड ग्राहकांच्या बोलण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. कारण जीएसटीनंतर कंपन्यांकडून टॉकटाईममध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून सर्व टॉकटाइम ऑफर देणाऱ्या वाउचरवर कंपन्या 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे. उदा. त्यामुळे 100 च्या रिचार्जवर 100 रुपयांचा टॉकटाइम न मिळता त्यात कपात होण्याची शक्यता आहे. फुल टॉकटाइम मिळणाऱ्या .प्लॅनवर कमी टॉकटाइम मिळू शकते.