अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात चीन, भारताची घोडदौड

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

लंडन : अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील "अर्न्स्ट अँड यंग' संस्थेच्या मानांकनातून हे मंगळवारी स्पष्ट झाले.

लंडन : अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील "अर्न्स्ट अँड यंग' संस्थेच्या मानांकनातून हे मंगळवारी स्पष्ट झाले.

"अर्न्स्ट अँड यंग'च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या 40 देशांमध्ये चीन अव्वल स्थानी असून, भारत दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या मानांकनात अमेरिका प्रथम क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा धोरणात केलेल्या बदलांमुळे ही घसरण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने याआधीची तापमान बदलाबाबतची अनेक धोरणे रद्द करीत अमेरिकेतील कोळसा उद्योगाचे पुरुज्जीवन करणारे धोरण अवलंबले आहे.

चीनने या वर्षी अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी 2020 पर्यंत 363 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने 2022 पर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट 175 गिगावॉट ठेवले आहे. "अर्न्स्ट अँड यंग'च्या मानांकनात युरोपीय देशांमधील जर्मनी चौथा, फ्रान्स आठवा; तर ब्रिटन दहावा आहे. ब्रिटन गेल्या वर्षी या मानांकनात चौदावा होता.