जीएसटीमुळे या सिगरेट कंपनीची कोटीच्या कोटी उड्डाणे

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई: आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी असलेल्या 'आयटीसी'चे बाजारभांडवल 4 लाख कोटींवर पोचले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सिगरेटवर अतिरिक्त सीमा शुल्क आकारणीतून सूट देण्यात येणार आहे.

परिणामी गुंतवणूकदारांनी 'आयटीसी'चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आज मुंबई शेअर बाजारात 'आयटीसी'च्या शेअरने वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे

'आयटीसी'च्या शेअरने इंट्राडे व्यवहारात 353.20 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. शेअर सकाळच्या सत्रात 9 टक्क्यांनी वधारला होता. गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटीसारख्या कंपन्यांचे शेअर्स देखील 4 टक्क्यांनी वधारले आहेत.

केंद्रीय अबकारी कर खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मूळ एक्साइज ड्यूटी आणि अतिरिक्त एक्साइज ड्युटी रद्द करण्यात आल्या आहेत आणि केवळ सिगरेटसाठी जीएसटी नियमानुसारच 'नॅशनल केलॅमिटी ड्यूटी' लागू असेल.

'चार लाख कोटींच्या क्लब'मध्ये समावेश

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (आरआयएल) आणि एचडीएफसी बॅंक यांच्याप्रमाणेच आता आयटीसीचा 'चार लाख कोटींच्या क्लब'मध्ये समावेश झाला आहे. टीसीएस, आरआयएल आणि एचडीएफसी बॅंक यांचे बाजारभांडवल चार लाख कोटीनहून अधिक आहे. आता आयटीसीचे भांडवल 416,655.24 कोटींवर पोचले आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात आयटीसीचा शेअर 19 रुपयांच्या वाढीसह 343 रुपयांवर व्यवहार करतो आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने वर्षभरात 178.76 रुपयांची नीचांकी तर 353.20 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 416,655.24 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.