एअर एशियाच्या प्रमुखांवर गुन्हा 

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण परवाना मिळविण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर एशिया समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिल्ली, मुंबई आणि बंगळूरसह देशभरात सहा ठिकाणी सीबीआयने छापे घातले आहेत. 

आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्या सुरू करण्याचा परवाना मिळविण्यासाठी देशांतर्गत विमान कंपनीला पाच वर्षांचा अनुभव आणि ताफ्यात वीस विमाने असणे बंधनकारक होते. हा नियम शिथिल करण्यासाठी टोनी फर्नांडिस यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरले. हा नियम रद्द झाल्यामुळे एअर एशियाचा आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग मोकळा झाला. या प्रकरणी फर्नांडिस याच्यासह एअर एशिया मलेशिया समूहाचे प्रमुख, ट्रॅव्हल फूडचे प्रवर्तक सुनील कपूर, एअर एशियाचे संचालक आर. वेंकटरमण, हवाई वाहतूक सल्लागार दीपक तलवार आणि सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: crime on air asia chief tony fernandes