कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; विमान कंपन्यांच्या शेअर्सची भरारी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

मुंबई: कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने विमानवाहतूक कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेट एअरवेज, स्पाइसजेट आणि इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअरमध्ये आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात 2 ते 4 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतात तेव्हा विमानवाहतूक कंपन्यांचा इंधनापोटी होणारा खर्च कमी होतो. यामुळे कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणेच्या शक्यता वाढतात. कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम सर्व देशांकडून पाळले जातात की नाही याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात शंका उपस्थित होत असल्याने आज कच्च्या तेलाच्या किंमतींनी नीचांक गाठला. ब्रेंटच्या किंमती 6 टक्क्यांनी कमी होऊन 45.96 डॉलर प्रति बॅरल झाल्या आहेत.