नोटाबंदीचा विकासदरावर परिणाम नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

तिसऱ्या तिमाहीत 7.1 टक्‍क्‍यांनी वाढ 

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेला उतरती कळा येईल, अशी शक्‍यता असताना नोटाबंदीचा देशाच्या विकासदरावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. 2016-17 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकासदर 7.1 टक्के राहिला आहे. विशेष म्हणजे ऑक्‍टोबर ते डिसेंबरमध्ये हा विकासदर नोंदविण्यात आला.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात चलनतुटवडा जाणवला होता. अजूनही बऱ्याच ठिकाणी चलनतुटवड्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत विकासदरावर मात्र याचा काहीही परिणाम झालेला नाही. केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) दिलेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीतील विकासदरात 7.1 टक्‍क्‍याने वाढ दर्शवली आहे. याआधी देशाचा विकासदर 6.1 टक्के राहण्याचे अंदाज बांधण्यात येत होते. उत्पादन क्षेत्राचा विकासदर 8.3 टक्‍क्‍याने वाढत असून, एकूण विकासदर 7.1 टक्‍क्‍याने वाढत असल्याचे निरीक्षण सांख्यिकी विभागाने नोंदविले आहे.

निवडणूक आयोगाच्या परवानगीने सांख्यिकी विभागाने विकासदराची आकडेवारी जाहीर केली. निवडणूक आयोगाने काही अटींवर ही आकडेवारी जाहीर करण्यास परवानगी दिली. सध्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आल्या आहेत.

Web Title: demonetisation no effect ongrowth rate