डिजिटल टेक्‍नॉलॉजी तुमचे आयुष्यच बदलून टाकणार

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

"सीआयआय बॅंकिंग समिट"मध्ये तज्ज्ञांचे मत

मुंबई: बॅंका आणि वित्त सेवा पुरवठादार कंपन्यांकडून नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणार वापर केला जात आहे. क्रेडीट मॉडेलिंग, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्‍स ऑटोमेशन, ड्रोन्स, डिजिटल आणि व्हर्च्युअल रिऍलिटी आदी तंत्रज्ञानांचा वापराने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत बॅंकिंग सेवा पोहचवता येणार असून सायबर क्राईमची जोखीम कमी होण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारची सर्वांना ब्रॉडबॅंड सेवा देण्याची योजना आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनचा वाढता वापर डिजिटल बॅंकिंग सेवेला चालना देणार असल्याचे मत बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या "बॅंकिंग टेक समिट"मध्ये बॅंकिंग क्षेत्रातील टेक्‍नॉलॉजी वापरावर चर्चा करण्यात आली. "कॅशलेस इकॉनॉमी"ने दुर्गम भागात टेक्‍नॉलॉजीच्या सहाय्याने वित्त सेवा देणे शक्‍य होणार असल्याचे "सीआयआय"च्या बॅंकिंग टेक समिटचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी सांगितले. टेक्‍नॉलॉजीने दैनंदीन सेवा सोपी आणि गतिमान बनेल. फिनटेकमुळे ग्रामीण भागात वित्तीय समावेशनाला बळ मिळेल. मात्र याचवेळी बॅंकांनी आणि संबधित कंपन्यांनी सुरक्षेवर दुर्लक्ष करून चालणार नाही, असे पीडब्ल्यूसी इंडियाचे प्रमुख विवेक बेळगावी यांनी सांगितले. या परिषदेला ऍक्‍सिस बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा, सीआयआयच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख निनाद कर्पे, संचालक सौगत मुखर्जी उपस्थित होते.

Web Title: Digital technology will change your life