शेअर बाजाराची निराशाजनक सुरूवात; सेन्सेक्समध्ये 100 अंशांची घसरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई: शेअर बाजाराची आज (शुक्रवार) निराशाजनक सुरूवात झाली आहे. येत्या 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू होणार असल्याचे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीची सकारात्मक सुरूवात झाल्यानंतर सध्या घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 114 अंशांची घसरण झाली असून तो 31,176.20 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 49 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या 9,580.95 अंशांवर आहे.

मुंबई शेअर बाजारात रिअल्टी इंडेक्स सर्वाधिक 2.03 टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ मेटल 1.26 टक्के, पीएसयू बॅंक 1.12 टक्के आणि ऑटो 1.11 टक्क्यांनी घसरला आहे. याउलट आयटी निर्देशांक 0.27 टक्क्यांनी व टेक 0.14 टक्क्यांनी वधारला आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात पॉवर ग्रिड (+ 1.07 टक्के), लुपिन (0.63 टक्के), सन फार्मा (0.53 टक्के), एनटीपीसी (0.53 टक्के) आणि इन्फोसिस (0.4 9 टक्के) यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर टाटा मोटर्स (-1.36 टक्के), अदानी पोर्ट्स (-1.2 9 टक्के), टाटा मोटर्स डीव्हीआर (-1.22 टक्के) आणि ओएनजीसीच्या (-1.15 टक्के) शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.