डोनाल्ड ट्रम्प ही आहेत कर्जबाजारी!

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

वॉशिंग्टन: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि अशा अर्थव्यवस्थेचे 'बिझनेस मॅन' अध्यक्ष किती श्रीमंत असतील ना...! बरोबर आपण अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीच बोलतोय. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. मात्र असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प हे देखील कर्जबाजारी आहेत. नुकत्याच सरलेल्या वर्षात (2016-17) मध्ये ट्रम्प यांनी 59 कोटी डॉलर्सचे उत्पन्न मिळविले होते. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांच्या मालमत्तेत देखील घसरण नोंदवण्यात आली आहे. ती 3 अब्ज डॉलर्सवरुन कमी होऊन 2.9 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे.

ट्रम्प यांच्यावर 31.56 कोटी म्हणजे सुमारे 21 अब्ज रुपये कर्ज आहे, असे अमेरिकेच्या एका आर्थिक अहवालातून समोर आले आहे. ट्रम्प यांचे वडील फ्रेडरिक ट्रम्पही बांधकाम व्यवसायात होते. ट्रम्प यांनी तो वारसा पुढे चालू ठेवला आहे. गेल्या 40 वर्षांत ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा पसारा एवढा वाढला, की ते जवळपास 100 कंपन्यांचे मालक आहेत.

जगभरातील अनेक देशांमध्ये ट्रम्प यांचे व्यवसाय आणि मालमत्ता आहेत. त्यांचे जगभरात हॉटेल्स असून बांधकाम व्यवसायातून मोठा पैसा मिळविला आहे. शिवाय त्यांच्या हॉटेल्स उद्योगातून त्यांना मोठा नफा प्राप्त होतो. त्यांचे अमेरिकेत वॉशिंग्टन येथे हॉटेल असून फ्लोरिडातील मार ए लोए या रेस्टॉरंट लोकप्रिय आहे.