एसयूव्ही 'जीप कंपास' १५ लाखांत उपलब्ध

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

जीप कंपासमध्ये  50 हुन  अधिक  सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये एबीएस, हिल स्टार्ट अॅसिस्ट, अॅडेप्टिव्ह ब्रेक लाईट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक प्रणालीचा समावेश आहे. शिवाय या  एसयूव्हीमध्ये  सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत

मुंबई : अमेरिकेतील दिग्गज  ऑटोमोबाईल कंपनी जीपने भारतात नुकतीच एसयूव्ही जीप कंपास (Jeep Compass) सादर  केली आहे.  कंपनीने जीप कंपाससाठी 14.95 लाख रुपये किंमत जाहीर केली आहे. यातील  टॉप मॉडेल 20.65 लाख रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जीप इंडिया येत्या वर्षात भारतात विस्तार करणार आहे. यासाठी वर्ष अखेरीस देशात 50 आऊटलेट्स उघडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

जीप ची ही एसयूव्ही "मेड इन इंडिया' आहे. या एसयूव्हीमध्ये मल्टीएअर पेट्रोलच्या तीन व्हेरियंट आणि 7 मल्टीएअर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये स्पोर्ट, लॉन्गिट्यूड, लॉन्गिट्यूड ऑप्शन, लिमिटेड, लिमिटेड ऑप्शन, लिमिटेड 4X4 आणि लिमिटेड ऑप्शन 4X4 ऑप्शनचा समावेश आहे.

भारतात आता जीपची एसयूव्ही आल्यानंतर इतर कंपन्यांच्या एसयूव्हीला मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.

कशी आहे जीप कंपास ?

जीप कंपासमध्ये  50 हुन  अधिक  सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये एबीएस, हिल स्टार्ट अॅसिस्ट, अॅडेप्टिव्ह ब्रेक लाईट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक प्रणालीचा समावेश आहे. शिवाय या  एसयूव्हीमध्ये  सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत.