इंजिनिअर्स इंडिया शेअर्स बायबॅक करणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई: इंजिनिअर्स इंडियाने शेअर बायबॅकचा निर्णय घेतला आहे. कंपनी चार कोटी शेअर्स बायबॅक करणार असून त्यासाठी रु.658.80 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. .

कंपनीच्या संचालक मंडळाने 4,19,61,780 कोटी शेअर्स बायबॅक करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. हे कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 6.23 टक्के शेअर्स आहेत. प्रतिशेअर 157 रुपये प्रमाणे कंपनी बायबॅक करणार आहे. सध्या कंपनीत सरकारची 57.53 टक्के मालकी आहे.

सरकारी तेल कंपनी असलेल्या ऑईल इंडिया देखील रु.1,527 कोटींचे शेअर बायबॅकचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात इंजिनिअर्स इंडियाचा शेअर 150.70 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 4.50 रुपयांची म्हणजेच 2.90 टक्के घसरण झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.10,138.42 कोटींचे बाजारभांडवल आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात  71.63 रुपयांची नीचांकी तर 169.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

Web Title: Engineer India buyback shares