पुरेशा नोटा उपलब्ध - दास

पीटीआय
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - बॅंकांकडे पुरेसा चलनसाठा उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न करून देशवासीयांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी केले. 

एटीएममधील बदल करण्याचे काम सुरू असून, यासाठी आता आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहितीही दास यांनी दिली आहे. आता एटीएममधून दिवसभरात कितीही वेळा रक्कम काढता येईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

नागरिकांनी घाबरू नये, आगामी काही दिवसांमध्ये पुरेशा नोटा उपलब्ध असतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू, ऊर्जामंत्री पियूष गोयल आणि अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी पत्रकार परिषद घेतली. 

अर्थविश्व

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017