करमणूक कर विभाग होणार कायमचा बंद

शिवचरण वावळे
शुक्रवार, 2 जून 2017

जूनपासून अंमलबजावणी शक्‍य: जीएसटी प्रणालीचा फटका, कर्मचारी इतरत्र वर्ग होणार
नांदेड: देशभर जीएसटी प्रणाली लागू होत असल्यामुळे महसूल मधील महत्वाचा करमणूक कर विभाग जून महिण्यापासून पासून बंद होत आहे. या विभागातील अधिकारी कर्मचारी इतरत्र हलविण्यासाठी महसुल विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.

जूनपासून अंमलबजावणी शक्‍य: जीएसटी प्रणालीचा फटका, कर्मचारी इतरत्र वर्ग होणार
नांदेड: देशभर जीएसटी प्रणाली लागू होत असल्यामुळे महसूल मधील महत्वाचा करमणूक कर विभाग जून महिण्यापासून पासून बंद होत आहे. या विभागातील अधिकारी कर्मचारी इतरत्र हलविण्यासाठी महसुल विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.

वेगवेगळ्या कर प्रणालीमुळे महसूल मध्ये करमणूक कर विभागाला अनन्यसाधारण महत्व होते. करमणूक कर जमा करण्यासाठी त्यांचे उदीष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक घडामोडी होत होत्या. उदीष्ट पूर्ण करणे हा विषय चर्चेचा होत होता. केबल नेटवर्कची वसुली, परवाना नुतनीकर यासह अनेक विषय या कार्यालयाकडे असायचे. मात्र देशभर जीएसटी (गुडस्‌ ऍण्ड सर्व्हीस टॅक्‍स) ची अंमलबजावणी होत आहे. यात करमणूक करा ऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे. परिणामी करमणूक कर जमा करण्याचे कामच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे महसूल मधिल महत्वाचा असा करमणूक कर विभागच कायमचा बंद होणार आहे. या विभागातील कर्मचारी-अधिकारी अन्य कोणत्या विभागात मुरविता येतील याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्ह्यातील करमणूक कर विभागात अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर विभागात सहभागी करण्यासाठी त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
३१ मे नंतर हा विभाग बंद होण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. काहीच नाही झाले तरीही त्यांना कोणतेच काम उरलेले असणार नाही. यानंतर महिन्याभरात हा विभाग कायमचा बंद होण्याची शक्‍यता आहे. मात्र जून पासूनच हा विभाग बंद होणार असे संकेत महसूल विभागाला मिळालेले आहेत, त्याच तयारीने अधिकारी कर्मचारी मुरविण्याचा प्रक्रीयेत लागले आहेत.

रिक्त जागांवर मुरविणार:

जीएसटी प्रणालीमुळे करमणूक कर विभाग बंद होणार आहे. तेथील कर्मचारी इतरत्र मुरविणे आवश्‍यक असणार आहे. जेथे रिक्त जागा आहेत, तेथे त्यांचे प्रयोजन करण्यात येणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.