ईपीएफओची शेअर बाजारातील गुंतवणूक रु.18 हजार कोटींवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

हैदराबाद : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भांडवली बाजारात फेब्रुवारी 2017 पर्यंत रु18,609 कोटींची गुंतवणूक केली आहे.

ईपीएफओने 18 फेब्रुवारीपर्यंत शेअर बाजारात ईक्विटी ट्रेडेड फंडमध्ये (ईटीएफ) रु. 18 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये निफ्टी 50 आणि सेन्सेक्स निर्देशांक आधारित ईटीएफमध्ये रु.17,105 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर सीपीएसई निर्देशांक आधारित ईटीएफमध्ये रु.1504 कोटींची गुंतवणूक केली आहे.

गुंतवणूक पुढील आर्थिक वर्षात 15 टक्‍क्‍यांवर नेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती केंद्रीय रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली होती.
मागील दीड वर्षात ईपीएफओ'ने भांडवली बाजारात 18 हजार 69 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ईपीएफओ'कडून सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये गुंतवणूक सुरू असून, त्यातून आतापर्यंत 19.13 टक्के परतावा मिळाला आहे. "ईपीएफओ'कडे सध्या 8 लाख कोटींपेक्षा अधिक निधी आहे. यातील गुंतवणूकयोग्य निधी 1.40 लाख कोटी आहे.

Web Title: EPFO invest sharemarket 18 thousand crore