EPFO सात दिवसांत निकाली काढणार 'डेथ क्लेम'

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

निष्क्रिय खात्यांवरही मिळणार व्याज :
केंद्र सरकारने ईपीएफच्या निष्क्रिय खात्यांवरही व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ईपीएफओ कार्यरत नसलेल्या ईपीएफ खात्यांवर 8.8 टक्के दराने व्याज देणार आहे. यासंदर्भात देखील केंद्र लवकरच अधिसूचना काढणार असल्याची माहिती केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी काल दिली.

ईपीएफच्या कार्यरत नसलेल्या खात्यांवर 2011 पासून कोणतेही व्याज देण्यात आलेले नाही. आता केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार या खात्यांवर 8.8 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. सध्या कार्यरत नसलेल्या खात्यांमध्ये एकूण रु.42 हजार कोटींची रक्कम पडून आहे. आता सरकारच्या या निर्णयाचा 9.70 कोटी कर्मचाऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सात दिवसांच्या आत मृत्यूचे दावे (डेथ क्लेम) निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कर्मचारी निवृत्त होण्याच्या आधीच निवृत्ती दावा (रिटायमेंट क्लेम) पूर्ण करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच डेथ आणि रिटायमेंट क्लेम निकाली काढण्यासाठी एक निश्चित कालावधी आणि मार्गदर्शक तत्वे ठरवण्याचे आदेश दिले होते. यावर कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी आढावा घेत निर्णय घेतल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.

सुरुवातीच्या काळात डेथ अथवा रिटायमेंट क्लेम केल्यानंतर 'क्लेम सेटल' बराच कालावधी लागायचा. आता मात्र व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर सात दिवसांच्या आता दावा निकाली काढण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचारी निवृत्ती प्रकरणांमध्ये निवृत्त होण्याच्या एक दिवस आधीच रिटायमेंट क्लेमची कृतीशील कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: epfo to resolve death claim within a week