पर्यटन महामंडळाचा इतिहाद - जेट एअरवेजशी करार 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

मुंबई : राज्यात पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा फायदा मिळावा यासाठी पर्यटन विकास महामंडळाने इतिहाद व जेट एअरवेजशी सामंजस्य करार केला आहे.

दोन्ही विमान कंपन्या प्रवाशांना महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांची माहिती विमानातील मासिके आणि जाहिरातींतून देणार आहेत. इतिहाद आणि जेट एअरवेज ही विमान वाहतुकीतील दोन महत्त्वपूर्ण नावे आहेत. परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रातली विविध पर्यटनस्थळे सुचवण्यात त्यांची मदत होईल.

त्यामुळे केवळ पर्यटनस्थळे स्पर्धात्मक बनणार नाहीत; तर पर्यटकांकडे उपलब्ध असणाऱ्या पर्यायांमध्येही वाढ होईल. एकाहून एक सरस अशा पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्‍वास एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज यांनी व्यक्त केला.