‘न्यूट्रिशन आणि वेलनेस’ श्रेणीत ‘ॲम्वे इंडिया’चा विस्तार

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

मदुराई - ग्राहकांना थेट मालाची विक्री करणाऱ्या (डायरेक्‍ट सेलिंग) ‘ॲम्वे इंडिया’ने ब्यूटी इन द हर्बल आणि पर्सनल केअर श्रेणीत नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित केली आहेत. या नव्या उत्पादनांसह २०२५ पर्यंत सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 

तामिळनाडूतील मदुराई येथील प्रकल्पात ॲम्वे इंडियाने आतापर्यंत ६०० कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षांत संशोधन, विकास आणि डिजिटलायझेशनसाठी आणखी १०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती ॲम्वे इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. डायरेक्‍ट सेलिंग उद्योगात ‘ॲम्वे’ने दोन दशकांत चांगली मजल मारली आहे. ‘न्यूट्रिशन आणि वेलनेस’मधील उत्पादनांची वाढती मागणी पाहता या श्रेणीतून सर्वाधिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे कंपनीने हर्बल उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाला प्राधान्य दिल्याचे ॲम्वे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू बुधराजा यांनी सांगितले.

Web Title: Expansion of Amway India in the Nutrition and Wellness category