युपी: कर्जमाफी दिल्यास बँकांना 28 हजार कोटींचा फटका

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्‍वासनासह अनेक आश्‍वासने देत प्रचंड बहुमताने विजयी होणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता आश्‍वासने पूर्ण करावी लागणार आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे ठरवल्यास बँकांना तब्बल 27 हजार 420 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालातून समोर आली आहे.

उत्तरप्रदेशात सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळून शेतकऱ्यांना 86,241.20 कोटींचे कर्जवाटप केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 31 टक्के कर्ज थेट छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. कर्जमाफी झाली तर बँकांचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सरकारकडून लहान शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी 27 हजार 419.70 कोटी रुपयांचे कर्ज माफ करावे लागेल. दरम्यान, भाजप सरकार आता विरोधकांच्याही निशाण्यावर आहे. आम्ही देखील कर्जमाफीच्या घोषणेची वाट पाहत आहोत, अशा प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.

अर्थविषयक सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या : SakalMoney.com