फेडरल बॅंक एटीएममध्ये २ हजारांच्या नोटा

यूएनआय
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कोची - फेडरल बॅंकेने एटीएमद्वारे दोन हजारांच्या नोटा देण्यास सुरवात केली आहे. एर्नाकुलम शाखेच्या एटीएममध्ये ही सेवा यशस्वीरीत्या सुरू करण्यात आल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. 

जुन्या हजार व पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर नव्याने चलनात आलेल्या दोन हजारांच्या नोटा एटीएमद्वारे देणारी फेडरल बॅंक भारतातील पहिली बॅंक आहे, असे बॅंकेने म्हटले आहे. याबाबत फेडरल बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी वॉरियर यांनी २५ टक्के एटीएम मशीनमध्ये येत्या बावीस तासांमध्ये आणखी दोन हजारांच्या नोटा टाकण्यात येणार आहेत, त्यामुळे गरजू लोकांना याचा लाभ घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स