फोर्ड इंडियाच्या 39,315 फिएस्टा, फिगो माघारी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

मुंबई: फोर्ड इंडियाने सुमारे 39,315 फिएस्टा क्लासिक आणि जुन्या फिगो मोटारी ग्राहकांकडून परत मागविण्यी घोषणा केली आहे. या मोटारींचे खराब झालेले पॉवर स्टिअरिंग होज दुरुस्त करण्यात येणार आहे. कंपनीच्या चेन्नई प्रकल्पात 2004 ते 2012 दरम्यान या मोटारींचे उत्पादन झाले होते.

कंपनीने स्वतःहून 39,315 फिएस्टा क्लासिक आणि फिगो मोटारी माघारी बोलाविण्याचे ठरविले आहे. यामधील हाय प्रेसर पॉवर स्टिअरिंग होजमध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, असे फोर्ड इंडियाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, कंपनीने या प्रकल्पात तयार झालेल्या आणखी 15,600 फिगो आणि आयकॉन मोटारी अफ्रिकेतून परत बोलावल्या आहेत. या मोटारींमधील पॉवर स्टिअरिंगमधून फ्लुईड गळती होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे मोटारींना अचानक आग लागण्याची भीती निर्माण झाली होती.

कंपनीने याआधी 2013 साली काही कारणास्तव या दोन्ही मोटारींची दीड लाखाहून अधिक मॉडेल्स माघारी बोलाविली होती. गेल्यावर्षीदेखील कंपनीने हॅचबॅक फिगो आणि फिगो अॅस्पायरची 42 हजारांहून अधिक मॉडेल्स, तसेच 16 हजारांहून अधिक मॉडेल्स एसयुव्ही परत बोलावल्या होत्या.

टॅग्स

अर्थविश्व

पुणे - सॅमसंग इंडियाने सणासुदीचे निमित्त साधून ‘सॅमसंग’चे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ‘नेव्हर माइंड’ ही ऑफर आज जाहीर केली....

09.12 AM

नवी दिल्ली - सणासुदीच्या दिवसांत ‘रिलायन्स जिओ’ने आता ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. ‘जिओ’ने फक्त रु. ९९९ मध्ये...

09.12 AM

विक्रीकर खात्याकडून व्यवसाय कराच्या कायद्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. व्यवसाय कर हा प्रत्येक व्यक्ती किंवा मालक, जो...

09.12 AM