स्पाईसजेटकडून नवी चार उड्डाणे

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

नवी दिल्ली: स्पाईसजेटने जयपूर आणि गुवाहाटीशी जोडणाऱ्या उड्डाणांसह नवी चार उड्डाणे सुरू करण्याची घोषणा गुरुवारी केली. जयपूर आणि गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा सुरू करणारी स्पाईसजेट पहिली कंपनी ठरली आहे.

नवी दिल्ली: स्पाईसजेटने जयपूर आणि गुवाहाटीशी जोडणाऱ्या उड्डाणांसह नवी चार उड्डाणे सुरू करण्याची घोषणा गुरुवारी केली. जयपूर आणि गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा सुरू करणारी स्पाईसजेट पहिली कंपनी ठरली आहे.

स्पाईसजेटची तीन उड्डाणे 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. हैदराबाद-जयपूर-हैदराबाद, जयपूर-गुवाहाटी-जयपूर, हैदराबाद-चंडीगड-हैदराबाद अशी ही तीन थेट उड्डाणे असतील. याचबरोबर दिल्ली-पाटणा-दिल्ली हे उड्डाण 10 जुलैपासून सुरू होणार आहे. जयपूर आणि गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा सुरू करणारी स्पाईसजेट पहिलीच कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्पाईसजेटकडून रोज 365 उड्डाणे होतात. यातील 30 देशांतर्गत आणि 7 आंतरराष्ट्रीय मार्गांवर होतात.