इंधन दरवाढीवर सारवासारव

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 मे 2018

नवी दिल्ली - पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे वाढलेला जनाक्रोश आणि विरोधकांच्या टीकेमुळे घायाळ झालेल्या सरकारने आता ‘दीर्घकालीन आढावा घेऊन दरवाढीबाबत निर्णय केला जाईल,’ अशी सारवासारव केली आहे. मात्र, काँग्रेसने सरकारला पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्क का कमी करत नाही, असा थेट प्रश्‍न केला आहे. 

इंधन दरवाढीमुळे सरकारच्या तोंडचे पाणी पळाले असून, दर नियंत्रणाची भाषा सरकारने सुरू केली आहे. याबाबत कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले होते. बऱ्याचदा पेट्रोल- डिझेलचे दर कमीही झाले. आता सरकारने दीर्घकालीन आढावा घेण्याचे ठरविले आहे. हा आढावा झाल्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, तोपर्यंत प्रतीक्षा करावी. मात्र, उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग विकासकामांसाठी केला जातो. 

पेट्रोल- डिझेलचा समावेश ‘जीएसटी’मध्ये करावा, अशी मागणी काँग्रेसने केली. सरकारने गेल्या चार वर्षांत तब्बल अकरा वेळा उत्पादन शुल्क वाढवून सामान्यांच्या खिशावर दरोडा घातल्याचा आरोप मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

पेट्रोलच्या दरामध्ये २५ रुपयांची कपात शक्‍य आहे; पण सरकार तसे करणार नाही. एक-दोन रुपयांची कपात करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करेल.
- पी. चिदंबरम, काँग्रेसचे नेते

Web Title: Fuel price hike