इंधन दरवाढीचा पंधरावा दिवस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरले असले, तरी देशात सोमवारी सलग पंधराव्या दिवशी इंधनदरवाढीचा भडका कायम राहिला. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८.२७ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ६९.१७ रुपये या नव्या उच्चांकी पातळीवर पोचला. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८६.०८ रुपये, कोलकता ८०.७६ आणि चेन्नईत ८१.११ रुपये होता. डिझेलचा दर मुंबईत आज प्रतिलिटर ७३.६४ रुपयांवर पोचला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या काळात २४ एप्रिलपासून १९ दिवस इंधन दरवाढ रोखण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालेली इंधन दरवाढ सलग १५ दिवस सुरू आहे.

Web Title: fuel rate increase