अदानींचा ऑस्ट्रेलिया प्रकल्पाला हिरवा कंदील; शेअर तेजीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई: अदानी एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ऑस्ट्रेलियातील कारमायकेल खाण प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. गुंतवणूकीसाठी अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाचे कामकाज सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत घोषणेनंतर आज(मंगळवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

"प्रकल्पाला गुंतवणूकीसाठी अंतिम मंजुरी मिळाली. यामुळे आता या ऐतिहासिक प्रकल्पाची अधिकृत सुरुवात होईल.", असे गौतम अदानी आपल्या निवेदनात म्हणाले.

या प्रकल्पामुळे तब्बल 10,000 रोजगार उपलब्ध होतील असाही त्यांनी दावा केला. कंपनीने या प्रकल्पात 3.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून आणखी निधीची जुळवाजुळव सुरु आहे. प्रकल्पाचे कामकाज लवकरच सुरु होणार असून या प्रकल्पातून भारतात कोळशाची निर्यात केली जाईल. मात्र, या प्रकल्पाला अनेक पर्यावरण संघटनांकडून विरोध होत आहे.

सध्या(1 वाजून 33 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर 126.00 रुपयांवर व्यवहार करत असून 8.35 रुपये अर्थात 7.10 टक्क्यांनी वधारला आहे.