सोने ५१ हजारांच्या उंबरठ्यावर; चार महिन्यांनंतर ५० हजारांच्या वर

सहा दिवसांत सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम १,५०० रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो दोन हजारांची वाढ झालेली आहे
gold rate
gold rategold rate

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना लग्नसराईवरील बंधनेही कमी होऊ लागली आहे. सोबतच अमेरिका आणि रशियामधील संघर्ष तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या वाढलेल्या किमतीमुळे सोने-चांदीच्या (Gold) दरात वाढ झाली आहे. चार महिन्यांनंतर सोन्याचे भाव ५० हजारांच्या वर गेले आहे.

सहा दिवसांत सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम १,५०० रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो दोन हजारांची वाढ झालेली आहे. त्यामुळे सोने प्रति दहा ग्रॅम ५० हजार ७०० तर चांदी प्रति किलो ६५ हजार ५०० रुपयांवर गेली आहे. मार्च महिन्यापासून लग्नसराईचा मोसम सुरू होणार आहे. लग्न सोहळ्यासाठी (Marriage season) व गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी वाढत आहे. युद्धाच्या स्थितीमुळे (Conflict between the US and Russia) अजून भाव वाढण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत.

gold rate
Hijab Controversy : २८ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी थांबवा; कारण...
आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम सोने दरवाढीच्या रूपाने दिसून येत आहे. अस्थिरता आल्यानंतर सराफा बाजारामध्ये दर चढ-उतार होत असतात. त्याचाच हा एक भाग आहे. ही स्थिती कायम राहिल्यास सोने ५६ हजारांवर जाऊ शकते. सोने (Gold) खरेदी करण्याची आता उत्तम संधी आहे.
- राजेश रोकडे, सचिव, सोना-चांदी ओळ

सोने दर - महिना वर्ष

  • ३०,००० - फेब्रुवारी - २०१९

  • ५८ हजार ८०० - फेब्रुवारी २०२०

  • ५० हजार - फेब्रुवारी - २०२१

  • ५०,७०० - फेब्रुवारी २०२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com