Gold-Silver Price: सोन्याचे दर घसरले तर चांदी झाली महाग, नवे दर जाहीर

गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे
Todays Gold Silver Update
Todays Gold Silver Updatesakal

गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दर कमी जास्त होत आहे मात्र या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याचे भाव स्थिर होते. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे तर या तुलनेत आज चांदीचे दर मात्र वाढले. (Gold silver update 15 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,390 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,700 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीच्या दर 600 रूपये आहे.

Todays Gold Silver Update
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 51,870 रुपये

दिल्ली - 51,700 रुपये

हैदराबाद - 51,700 रुपये

कोलकत्ता - 51,700 रुपये

लखनऊ - 51,890 रुपये

मुंबई -51,700 रुपये

नागपूर - 51,770 रुपये

पूणे - 51,770 रुपये

Todays Gold Silver Update
पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold Silver Update
शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सलग तिसऱ्या दिवशी Sensex अन् Nifty डाउन

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com