सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.
Today's Gold Price Updates | Gold Rates
Today's Gold Price Updates | Gold Ratesesakal

गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आजही सोन्याचे दर घसरले असून या तुलनेत चांदीचे दर मात्र वाढले. गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ म्हणता येईल. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. (Gold silver update 16 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,150 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,440 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीच्या दर 600 रूपये आहे.

Today's Gold Price Updates | Gold Rates
12 वर्षांनंतर दिसतेय 'या' शेअरमध्ये वाढ; गुंतवणुकदारांनी काय करावे?

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 51,500 रुपये

दिल्ली - 51,440 रुपये

हैदराबाद - 51,440 रुपये

कोलकत्ता - 51,440 रुपये

लखनऊ - 51,590 रुपये

मुंबई - 51,440 रुपये

नागपूर - 51,550 रुपये

पूणे - 51,550 रुपये

Today's Gold Price Updates | Gold Rates
सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये घसरण कायम, शेअर बाजारात अस्थिरता

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold Price Updates | Gold Rates
शेअर बाजारातील अस्थिरते दरम्यान ऑटो सेक्टरचा 'हा' शेअर करेल कमाल

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com