सोने-चांदी स्वस्त! दरवाढीवर ब्रेक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.
Todays Gold and silver prices
Todays Gold and silver pricessakal

गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. सलग दोन दिवस सोने चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली होती तर आज या वाढीला ब्रेक लागला असून सोने चांदीच्या किमतीत घट झाली आहे.

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,100 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 610 रूपये आहे.

Todays Gold and silver prices
जागतिक मंदीचे बाजारावर सावट; सेन्सेक्समध्ये १०१६.८४; तर निफ्टीत २७६.३०

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,200 रुपये

दिल्ली - 52,100 रुपये

हैदराबाद -52,100 रुपये

कोलकत्ता - 52,100 रुपये

लखनऊ - 52,250 रुपये

मुंबई - 52,100 रुपये

नागपूर - 52,130 रुपये

पूणे - 52,130 रुपये

Todays Gold and silver prices
तुमच्या घरात पैशाचा पाऊस पाडणारं झाड तुम्हाला माहिती का ?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Todays Gold and silver prices
Gold-silver Price: सोने चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com