निती आयोगावर राजीवकुमार यांची नियुक्ती

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

राजीवकुमार यांच्याबरोबरच "एम्स'मधील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख विनोद पॉल यांचीही निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राजीवकुमार हे धोरण आणि संशोधन विभागाचे वरिष्ठ फेलो होते.

नवी दिल्ली : निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद पंगारिया यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीवकुमार यांच्याबरोबरच "एम्स'मधील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख विनोद पॉल यांचीही निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राजीवकुमार हे धोरण आणि संशोधन विभागाचे वरिष्ठ फेलो होते. कुमार यांनी ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून डी.फिल आणि लखनौ विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे.

ते 2006 ते 2008 या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचेही सदस्य होते. याशिवाय, विविध वित्तसंस्थांमध्ये त्यांनी वरीष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.