मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांचा वाढवला कार्यकाळ

Arvind Subramanian
Arvind Subramanian

नवी दिल्ली: केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर 2018 पर्यंत पदावर कायम राहतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी सांगितले. ऑक्टोबर 2014 मध्ये पुढील तीन वर्षांसाठी सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी सांगितले की, सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

कोण आहेत सुब्रह्मण्यम?
अरविंद सुब्रह्मण्यम यांनी पदवीपूर्व शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. तर अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. यानंतरचे एम.फिल. आणि डी. फिलचे शिक्षण त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

2008मध्ये ‘इंडिया टर्न : अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन’ आणि 2011 मध्ये‘इक्लिप्स : लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स’ ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. तसेच 2012मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स?’ या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.

याबरोबरच 1988-92मध्ये ‘गॅट’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून हावर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (1999-2000) आणि जॉन हॉपकिन्सच्या स्कूल फॉर अ‍ॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजमध्ये (2008-12) अध्यापनाचे कार्यही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com