भारताच्या आयात-निर्यातीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली: भारताच्या निर्यातीत डिसेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये निर्यात 5.72 टक्‍क्‍यांनी वाढून 23.9 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्याआधीच्या वर्षात याच कालावधीत ती 22.6 अब्ज डॉलर होती.

वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या आयातीतही डिसेंबरमध्ये 0.46 टक्के वाढ होऊन ती 34.25 अब्ज डॉलरवर गेली आहे. यामुळे व्यापारी तूट 10.36 अब्ज डॉलरवर पोचली आहे. तेलाची आयात डिसेंबरमध्ये 14.61 टक्‍क्‍यांनी वाढून 7.465 अब्ज डॉलरवर गेली आहे. डिसेंबर 2015 मध्ये ही आयात 6.670 अब्ज डॉलर होती.
बिगरतेल वस्तूंच्या आयातीत डिसेंबरमध्ये 2.98 टक्‍क्‍यांची घसरण होऊन ती 26.608 अब्ज डॉलरवर आली आहे. डिसेंबर 2015 मध्ये ही आयात 27.425 अब्ज डॉलर होती. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत निर्यात 0.75 टक्के वाढून 198.8 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याच कालावधीत आयात 7.42 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 275.3 अब्ज डॉलरवर आली आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत व्यापारी तूट 76.54 अब्ज डॉलर झाली असून, त्याआधीच्या वर्षात याच काळात ती 100 अब्ज डॉलर होती.

Web Title: The growth of India's imports and exports